मोगऱ्याच्या सुवासिक फुलांसह गुलाब, लिली, चाफा, झेंडूच्या फुलांची आरास श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सोमवारी वासंतिक उटी मोगरा महोत्सवानिमित्त करण्यात आली. तब्बल ५० लाख सुवासिक फुलांचा गंध मंदिर परिसरात दरवळत होता. गणरायाला फुलांचा महानैवेद्य दाखविल्याचे मनोहारी दृश्य यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवायला मिळाले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. गणरायाच्या चांदीच्या मूर्तीला उटीचे लेपन करण्यात आले होते. तब्बल २५० महिला व ७० पुरुष कारागीरांनी सलग तीन दिवस पुष्पसजावटीची तयारी केली होती.

swiggy IPO, share market,
विश्लेषण : ‘स्विगी’च्या समभागांसाठी बोली लावणे फायद्याचे की तोट्याचे?
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
snails in freshwater pune
पुणे शहरातील गोड्या पाण्यातील गोगलगायींचे प्रमाण का घटतेय? स्थानिक जैवविविधतेसाठी धोक्यीची घंटा?
Shrimant Dagdusheth Halwai Ganpati latest news
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला तब्बल ११०० नारळांचा महानैवेद्य
Ants the World’s First Farmers?
Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?
Seaweed imports What is the use of the element What is the benefit of this decision of the central government
चक्क समुद्र शैवालाची आयात? या घटकाचा उपयोग काय? केंद्र सरकारच्या या निर्णयाचा किती फायदा?
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!

गणरायाच्या मूर्तीला शुंडाभूषण, कानवले, मुकुट, अंगरखा यांसह फुलांनी साकारलेली विविध आभूषणे परिधान करण्यात आली होती. मोगरा महोत्सवानिमित्त विविधरंगी फुलांनी सजलेले मंदिर पाहण्यासोबतच हे दृश्य मोबाईलमध्ये टिपण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, यंदाच्या पुष्पसजावटीमध्ये ७०० किलो मोगरा, ३० हजार चाफा, २६ हजार गुलाब, ९० किलो कन्हेर, ३०० किलो झेंडू, जाई, जुई, कमळ, ५०० किलो गुलछडी, पासली, लिली यांसह अनेक प्रकारची फुले वापरण्यात आली होती. मोगरा महोत्सवाच्या वेळी वासंतिक उटीचे भजन भारतीय वारकरी मंडळातर्फे करण्यात आले.