पुणे : विसर्जन मिरवणुकीला होणारा विलंब आणि भाविकांच्या भावनांचा विचार करून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती यंदा विसर्जन मिरवणुकीत दुपारी चार वाजता सहभागी होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी बुधवारी ही माहिती दिली. चव्हाण म्हणाले, मागील अनेक वर्षे दगडूशेठ गणपती बाप्पा विसर्जन मिरवणूक परंपरेप्रमाणे रात्री लक्ष्मी रस्त्यावर पोलीस प्रशासनाने मार्ग उपलब्ध करून दिल्यावर सहभागी होत आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पिंपरी : वृक्षतोड रोखण्यासाठी चार पथके; फौजदारी गुन्हेही दाखल करणार

परंतु दरवर्षी निघायला होणारा उशीर खूपच वाढत चालला आहे. मागील वर्षी सकाळी ७.४५ वाजता बेलबाग चौकात बाप्पांचे आगमन झाले. भाविकांना बाप्पांच्या दर्शनासाठी खूप ताटकळत रहावे लागले.  म्हणून भाविकांच्या भावनांचा विचार करून तसेच ज्या वेळेत गणेश मंडळे मिरवणुकीत सहभागी व्हायला फारशी उत्सुक नसतात, अशावेळी दुपारी ४ च्या दरम्यान  श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्याने सहभागी होईल.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dagdusheth ganpati participated in immersion procession this year at 4 pm pune print news zws 70 vvk