पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात पाऊस ओसरला आहे. परिणामी खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला आहे. चारही धरणांमधील पाणीसाठा १९.३५ अब्ज घनफूट (टीएमसी) ६६.३८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मंगळवारी रात्रीपासून बुधवारी सकाळपर्यंत टेमघर धरण क्षेत्रात ३३ मिलिमीटर, वरसगाव धरण परिसरात १६ मि.मी, पानशेत धरण परिसरात १५ मि.मी, तर खडकवासला धरण क्षेत्रात अवघ्या दोन मि.मी. पावसाची नोंद झाली. सध्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पात १९.३५ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. मंगळवारी रात्री चारही धरणांत १९.०९ टीएमसी पाणीसाठा होता. मंगळवारी रात्रीच्या तुलनेत बुधवारी सकाळी ०.२६ टीएमसीने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बुधवारपासून (१३ जुलै) खडकवासला धरणातून मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून पाण्याचा विसर्ग पुर्णपणे थांबविण्यात आला आहे. सध्या नवीन मुठा कालव्यातून १००५ क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, असे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.

प्रमुख धरणांमधील पाणीसाठा टीएमसी, टक्क्यांत

टेमघर                   १.९७      ५३.११

वरसगाव               ८.०७     ६२.९७

पानशेत                 ७.३३      ६८.८७

खडकवासला        १.९७      १००.००

एकूण                   १९.३५    ६६.३८

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dam stopped water storage 66 percent water supply pune print news ysh
Show comments