लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : राज्यात मागील आठवड्यात झालेल्या अवकाळीमुळे विदर्भ, मराठवाड्यातील ८२,२६४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेली रब्बी पिके, उन्हाळी पिके, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Onion garlic shortage
बाजारात कांदा, लसणाचा तुटवडा ? जाणून घ्या, कांदा, लसणाच्या दरातील तेजी किती दिवस
Air Quality Index, air pollution, Uran city, raigad district
हवा प्रदूषणात उरण देशात तिसऱ्या क्रमांकावर, शहरातील नागरिकांना सर्दीखोकला तसेच श्वसनाचा त्रास
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..
tigress Bijli walking with three cubs
Video: ताडोबात ‘बिजली’ची डौलदार चाल…हिरव्या रानवाटेवर बछड्यांसह…

कृषी खात्याच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, १५ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार, अमरावतीत ५३,४०२ हेक्टर, अकोल्यात ११,१५७ हेक्टर, बुलडाण्यात ६,५१३ हेक्टर, वाशिममध्ये ३,८८८ हेक्टर, यवतमाळमध्ये २,४९४ हेक्टर, सोलापुरात १,४४७ हेक्टर, बीडमध्ये १०२१ हेक्टर, नांदेडमध्ये ७४९ हेक्टर, धाराशिव आणि वर्ध्यात प्रत्येकी ३०८ हेक्टर, नंदूरबारमध्ये १२२ हेक्टर, छत्रपती संभाजीनगरमध्ये १६३ हेक्टर, जालन्यात १३४ हेक्टर, लातूर ९५ हेक्टर, नागपुरात ९० हेक्टर, गोंदियात ४५ हेक्टर, भंडारा १३ हेक्टर, गडचिरोलीत ११ हेक्टर, चंद्रपूर चार हेक्टर आणि परभणीत तीन हेक्टर, असे एकूण ८२,२६४ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-पुणे: खासगी जलतरण तलावात बुडून शाळकरी मुलाचा मृत्यू

फळपिके, भाजीपाल्याचे मोठे नुकसान

अवकाळी, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे केळी, पपई, संत्री, मोसंबी, आंबा, चिकू, लिंबू या फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भात काढणीला आलेला रब्बी गहू, ज्वारी, उन्हाळी बाजरी, भात, तीळ, कांदा आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. उन्हाळी भाजीपाला पिकांच्या मोठ्या नुकसानीचा फटका अकोला जिल्ह्यात बसला आहे. अकोला जिल्ह्यात उन्हाळी भाजीपाला पिके मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. त्यासह अकोला परिसरात भाजीपाल्यांच्या रोपांचे उत्पादन हरितगृह किंवा शेडनेटमध्ये घेतले जाते. वादळी वाऱ्यात या हरितगृहांसह शेडनेटचेही मोठे नुकसान झाले आहे.

आणखी वाचा-सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती

अमरावती, अकोल्यात पिके मातीमोल

गारपिटीचा सर्वाधिक फटका अमरावतीला बसला. भातकुली, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, मोर्शी, चांदूर बाजार, वरूड या तालुक्यातील ५३,४०२ हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, तीळ, भाजीपाला, आंबा, संत्रा, लिंबू, मोसंबी, केळी, पपई पिकांचे नुकसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोला, बार्शी टाकळी, मुर्तिजापूर, बाळापूर, पातूर या तालुक्यांतील ११ हजार १५७ हेक्टरवरील कांदा, ज्वारी, भाजीपाला, मका, केळी, आंबा पिकाचे नुकसान झाले आहे.