पुणे : राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ७ ते २० एप्रिल या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३७,९८१.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्षे, भाजीपाल्याचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात १६०९१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात मका, कांदा, वाटाणा, किलगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब पिकांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात ८७६५ (पान ४ वर) (पान १ वरून) हेक्टरवर नुकसान झाले असून, त्यात लिंबू, भुईमूग, कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६२४३ हेक्टरवरील बाजरी, गहू, कांदा, आंबा, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)
नाशिक : ३७,९८१.७९, नगर : १६,०९१, अकोला : ८,७६५. ४५, छत्रपती संभाजीनगर : ६,२४३, बीड : ४,९९४, धाराशिव : ३,९८३.८०, जळगाव : २,४८१.६६, बुलडाणा : २,१७७, अमरावती : ८८६, सातारा : ६१५, सोलापूर : २६३.३६, जालना : ४३२.८०, पुणे : ५९३, धुळे : ४११.९५, यवतमाळ : १२०.६८, सांगली : ११०, नागपूर : ७९.२०, लातूर : ५८, गोंदिया : ५७.५३, रत्नागिरी: ५६, रायगड : ५०, कोल्हापूर : ५१, सिंधुदुर्ग : ३८, वाशिम : १८, वर्धा : ३३.५०