पुणे : राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे.कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती नुकसान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, ७ ते २० एप्रिल या कालावधीत नाशिक जिल्ह्यात ३७,९८१.७९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात प्रामुख्याने कांदा, द्राक्षे, भाजीपाल्याचा समावेश आहे. त्यापाठोपाठ नगर जिल्ह्यात १६०९१ हेक्टरवर नुकसान झाले आहे. त्यात मका, कांदा, वाटाणा, किलगड, आंबा, झेंडू, गहू, हरभरा, ज्वारी, बाजरी, डाळिंब पिकांचा समावेश आहे. अकोला जिल्ह्यात ८७६५ (पान ४ वर) (पान १ वरून) हेक्टरवर नुकसान झाले असून, त्यात लिंबू, भुईमूग, कांदा, गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ६२४३ हेक्टरवरील बाजरी, गहू, कांदा, आंबा, सूर्यफूल, भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे.
पुणे: राज्यात अवकाळीने ८७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान; दोन आठवडय़ांत फळपिकांना सर्वाधिक फटका
राज्यात गेल्या दोन आठवडय़ांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सुमारे ८७३७८.७२ हजार हेक्टरवरील रब्बी पिके आणि फळपिकांचे नुकसान झाले आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 27-04-2023 at 00:23 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Damage to crops on 87 thousand hectares due to bad weather in the state amy