पुणे : वारजे माळवाडी भागातील एका नामवंत शाळेतील नृत्य प्रशिक्षकाने चार वर्षांच्या बालकेशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. या घटनेनंतर संतप्त पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारून कारवाईची मागणी केली. याप्रकरणी पोलिसांनी रात्री उशिरा नृत्य प्रशिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेनंतर पालकांनी बुधवारी (१८ डिसेंबर) शाळा बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. समाज माध्यमातून संदेश पाठवून शाळेत जमण्याचे आवाहन पालकांकडून करण्यात आले आहे.

नृत्य प्रशिक्षकाने चार वर्षांच्या बालिकेशी अश्लील कृत्य केल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला. याबाबत बालिकेने पालकांकडे तक्रार केली. या घटनेनंतर पालकांनी शाळेच्या प्रशासनाला जाब विचारला. नृत्य प्रशिक्षकाला शाळेतून काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे संबंधित शाळेने स्पष्ट केले.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांकडून याप्रकरणाची चाैकशी करण्यात आली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करून नृत्य प्रशिक्षकाला अटक करण्यात आली, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.

Story img Loader