प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलने पिंपरी-चिंचवडकरांची मने जिंकली. धक- धक होतंय काळीज हे वेळ झाली…, हुंडा नको मामा तुमची पोरगी द्या मला..,कच- कच कांदा कापताना बोटं सुरीतन वाचवली अशा भन्नाट गीतांवर ताल धरून दिलखेच अदांनी उपस्थित महिला, तरुण- तरुणींना घायाळ केले. कासारवाडी येथील युवा कार्यकर्ते अमित लांडे यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तरुण- तरुणींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. एकीकडे गौतमी पाटील आणि गोंधळ हे समीकरण असताना पिंपरी- चिंचवडमध्ये मात्र निर्विघ्नपणे कार्यक्रम पार पडल्याचे पाहायला मिळालं. या कार्यक्रमाला पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
अवघ्या महाराष्ट्रातील तरुण- तरुणींना वेड लावलेल्या गौतमी पाटीलने पिंपरी- चिंचवडकरांची मने जिंकली. गौतमी पाटील हिने धक- धक होतंय काळीज हे, हुंडा नको मामा तुमची पोरगी द्या मला, कचकच कांदा कापताना बोट सुरतन वाचवली अशा गीतांवर नृत्य करत उपस्थितांची मने जिंकली. गौतमी पाटील म्हटलं की तरुणांमध्ये उत्साह संचारतो त्यामुळे अनेकदा वाद विवाद देखील झाल्याचं पाहायला मिळाल आहे. पोलिसांना मध्यस्थी करत सौम्य लाठीचार्ज करावा लागल्याचं काही वेळा बघायला मिळालं, तर अगदी घराच्या कौलावरून ते झाडावरून गौतमी पाटीलच नृत्य बघण्यासाठी नागरिक गर्दी करतात. असं असताना पिंपरी- चिंचवडच्या कासारवाडीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम मात्र निर्विघ्न पार पडला म्हणावं लागेल.