पुणे : करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण, त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पहिल्या लाटेत १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष कार्यदलाची (टास्क फोर्स) निर्मिती करण्यात आली होती. राज्यात पुन्हा एकदा करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जेएन. १ या उपप्रकाराचे रुग्ण वाढत आहेत. अशा वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता या टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी दिली.

आणखी वाचा-मालक कामावरून काढून टाकणार, भर रस्त्यात केला चाकू हल्ला; घटनेचा व्हिडिओ आला समोर

या टास्क फोर्समध्ये अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय ( पुणे) येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले वैद्यकीय महाविद्यालय (पुणे ) येथील डॉ. वर्षा पोतदार आणि डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत. तर आरोग्य सेवा आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.

टास्क फोर्स काय करणार?

  • गंभीर व अतिगंभीर आजारी करोना रुग्णांसाठी रुग्ण व्यवस्थापन प्रणाली स्थापन करणे
  • कोविड-१९ क्रिटीकल केअर हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टर आणि आरोग्य सेवा सहायक कर्मचाऱ्यांच्या आवश्यकतेची शिफारस करणे
  • गंभीरपणे आजारी कोविड-१९ रुग्णांवर उपचार करताना एकसमानता राखण्यासाठी योग्य औषध नियमावलीची शिफारस करणे
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Danger of jn 1 increased task force reconstituted pune print news stj 05 mrj
Show comments