भरधाव ट्रकने रस्ता ओलांडणाऱ्या पीएपीच्या चार तिकीट तपासनिसांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर देहूरोड फाटा येथे रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला.
विठ्ठल कृष्णा माळी आणि नंदकुमार किसन राजपूत (रा. थेरगाव) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर किसन चपटे (वय ४५) आणि गंगाराम साळुंखे (वय ५१, रा. पिंपळे गुरव) हे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड फाटा येथे हे चौघे जण तिकिटाची तपासणी करत होते. एका पीएमपी बसमधील तिकिटे तपासून रस्ता ओलांडत असताना मुंबईकडून पुण्याकडे येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये माळी आणि राजपूत यांचा मृत्यू झाला असून चपटे यांची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर ट्रक चालक पसार झाला असून त्याचा देहूरोड पोलीस शोध घेत आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा