पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (सीटीईटी) घेण्यात येते. राष्ट्रीय स्तरावर ही परीक्षा घेतली जाते. त्यामुळे या परीक्षेची घोषणा सीबीएसईकडून कधी करण्यात येणार याकडे उमेदवारांचे लक्ष लागले होते. या परीक्षेची तारीख आणि नोंदणीचा तपशील जाहीर करण्यात आला आहे.

सीबीएसईने दिलेल्या माहितीनुसार देशभरात सीटीईटी ७ जुलैला घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठीची अर्ज नोंदणी प्रक्रिया सुरू झाली असून, २ एप्रिल ही अर्ज भरण्यासाठीची अंतिम मुदत आहे.

Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
artificial intelligence
कुतूहल : चुकांची जबाबदारी निश्चित करण्याचे आव्हान!
Important information regarding Group-B Non-Gazetted and Group-C cadre posts outside MPSC purview
स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती! गट ब (अराजपत्रित), गट क संवर्गातील पदे एमपीएससीच्या कक्षेत आणण्यासाठी एक पाऊल पुढे…
Satara District Sessions Judge detained for questioning in attempt to take bribe
लाच मिळविण्याच्या प्रयत्नात सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश चौकशीसाठी ताब्यात
maharashtra vidhan sabha mpsc
MPSC मंत्र : महाराष्ट्र विधानसभा; पारंपरिक आणि तथ्यात्मक प्रश्न
upsc released announced annual time table
‘यूपीएससी’कडून विविध परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या कोणती परीक्षा कधी होणार?
transparency in voting
मारकडवाडीसह सर्व ठिकाणी ईव्हीएम मतदानात पारदर्शकता, जिल्हा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांचे स्पष्टीकरण

हेही वाचा – पिंपरी : विमानाच्या इंधानाचा काळाबाजार करणारी टोळी अटकेत

हेही वाचा – पुणे-नाशिक महामार्गासाठी तोडलेली झाडे महागात! पुन्हा झाडे लावण्यासाठी २३ कोटी देण्याचा आदेश

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (एनसीटीई) निर्णयानुसार पहिली ते आठवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. केंद्रीय स्तरावर सीबीएसईकडून सीटीईटी आयोजित केली जाते. त्यानुसार ३ जुलैला होणारी सीटीईटी ही १९वी परीक्षा असून, देशभरातील १३६ शहरांमध्ये ही परीक्षा होणार आहे. उमेदवारांना परीक्षा देण्यासाठी २० भाषांचा पर्याय उपलब्ध असणार आहे. पेपर एक सकाळी साडेनऊ ते बारा, तर पेपर २ दुपारी साडेचार या वेळेत होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परीक्षा आणि नोंदणीबाबतची अधिक माहिती
https://ctet.nic.in या संकेतस्थळावर देण्यात आल्याचे सीबीएसईकडून स्पष्ट करण्यात आले.

Story img Loader