लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या उद्घाटन सत्रातच होणार आहे. जन्मशताब्दी वर्ष असलेल्या साहित्यिकांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘साहित्यिकांचे  शताब्दी स्मरण’ हा विशेष कार्यक्रम संमेलनात होणार आहे.

shani rash parivartan 2025 shani guru transit change luck of these zodiac
Shani Rashi Parivartan 2025: नववर्षात शनि-गुरु बदलणार चाल, ‘या’ राशीच्या लोकांच्या नशिबाचे दार उघडणार, नोकरीसह मिळणार पैसाच पैसा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Shani gochar 2025
पुढील १३४ दिवसांचा काळ कमावणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
preliminary round of loksatta lokankika one act play competition
 ‘लोकसत्ता लोकांकिका’ची पहिली घंटा; प्राथमिक फेरी ३० नोव्हेंबरपासून; मुंबईत २१ डिसेंबरला महाअंतिम फेरी
ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश
१९ नोव्हेंबरला होऊ शकतो या राशींचा भाग्योदय! ग्रहांचा राजा सूर्य करणार शनीच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, प्रत्येक कामात मिळणार यश
jupiter retrograde 2024
५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अमळनेर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. संमेलनाध्यक्षपदासाठी महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांनी सुचविलेल्या नावांवर चर्चा झाली. मात्र, अन्य नावे कोणती हे सांगण्यास साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी नकार दिला.

आणखी वाचा-अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे

संमेलन पूर्व कार्यक्रमात १ फेब्रुवारी रोजी बालमेळावा होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. निमंत्रितांचे कविसंमेलन, ‘खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत, दोन परिसंवाद, कथाकथन, एका जुन्या पुस्तकावर परिचर्चा आणि खान्देश साहित्य वैभव असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. विस्मृतीमध्ये जात असलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण सध्याच्या पिढीतील कवी सादर करणार असून ते या कवितांविषयी भाष्य करतील. रविवार ४ फेब्रुवारी रोजी दोन परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी कट्टा आणि गज़ल कट्टा असे कार्यक्रम होणार असून दुपारी चार वाजता संमेलनाचे समारोप सत्र होईल. संमेलनात एक लेखक आणि एक प्रकाशकाचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये २५० गाळे असून पुस्तक प्रकाशनासाठी ग्रंथ प्रकाशन कट्टा करण्यात येणार आहे, असे तांबे यांनी सांगितले.

वर्धा येथील साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. आता अमळनेर संमेलनासाठी दोन कोटी रुपये द्यायचे तर तुम्ही पैसे कसे संकलित करता, अशी विचारणा मराठी भाषा विभागाने साहित्य महामंडळाकडे केली आहे. त्यानुसार संमेलनाच्या निमंत्रक संस्थेशी संवाद साधून किती खर्च अपेक्षित आहे याची ढोबळ माहिती देण्यात आली असून दोन कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचे मराठी भाषा विभागाला कळविण्यात आले आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी सांगितलं.