लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: अमळनेर येथे ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २ ते ४ फेब्रुवारी या कालावधीत प्रताप महाविद्यालयाच्या पटांगणावर होणार आहे. नियोजित अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे यांचे अध्यक्षीय भाषण संमेलनाच्या उद्घाटन सत्रातच होणार आहे. जन्मशताब्दी वर्ष असलेल्या साहित्यिकांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाचा वेध घेणारा ‘साहित्यिकांचे शताब्दी स्मरण’ हा विशेष कार्यक्रम संमेलनात होणार आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये अमळनेर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. रवींद्र शोभणे यांची एकमताने निवड करण्यात आली. संमेलनाध्यक्षपदासाठी महामंडळाच्या घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांनी सुचविलेल्या नावांवर चर्चा झाली. मात्र, अन्य नावे कोणती हे सांगण्यास साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी नकार दिला.
आणखी वाचा-अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रवींद्र शोभणे
संमेलन पूर्व कार्यक्रमात १ फेब्रुवारी रोजी बालमेळावा होणार आहे. २ फेब्रुवारी रोजी ग्रंथदिंडी, ग्रंथप्रदर्शन उद्घाटन, ध्वजारोहण झाल्यानंतर सकाळी अकरा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. निमंत्रितांचे कविसंमेलन, ‘खान्देशी बाणा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ३ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ साहित्यिकाची मुलाखत, दोन परिसंवाद, कथाकथन, एका जुन्या पुस्तकावर परिचर्चा आणि खान्देश साहित्य वैभव असे वैविध्यपूर्ण कार्यक्रम होणार आहेत. विस्मृतीमध्ये जात असलेल्या कवींच्या कवितांचे सादरीकरण सध्याच्या पिढीतील कवी सादर करणार असून ते या कवितांविषयी भाष्य करतील. रविवार ४ फेब्रुवारी रोजी दोन परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी कट्टा आणि गज़ल कट्टा असे कार्यक्रम होणार असून दुपारी चार वाजता संमेलनाचे समारोप सत्र होईल. संमेलनात एक लेखक आणि एक प्रकाशकाचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनातील ग्रंथप्रदर्शनामध्ये २५० गाळे असून पुस्तक प्रकाशनासाठी ग्रंथ प्रकाशन कट्टा करण्यात येणार आहे, असे तांबे यांनी सांगितले.
वर्धा येथील साहित्य संमेलनासाठी राज्य शासनाकडून दोन कोटी रुपयांचे अनुदान प्राप्त झाले होते. आता अमळनेर संमेलनासाठी दोन कोटी रुपये द्यायचे तर तुम्ही पैसे कसे संकलित करता, अशी विचारणा मराठी भाषा विभागाने साहित्य महामंडळाकडे केली आहे. त्यानुसार संमेलनाच्या निमंत्रक संस्थेशी संवाद साधून किती खर्च अपेक्षित आहे याची ढोबळ माहिती देण्यात आली असून दोन कोटी रुपयांचे अनुदान आवश्यक असल्याचे मराठी भाषा विभागाला कळविण्यात आले आहे, असे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी सांगितलं.