पुणे : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला पुण्याबाहेर सोडणाऱ्या मोटारचालकाला पोलिसांनी अटक केली. दत्ता डोके असे अटक करण्यात आलेल्या मोटारचालकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोके शहरातील एका नामांकित शिक्षण संस्थेच्या संचालकाकडे चालक आहे. ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पोलिसांनी दोन कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले होते. ससूनमध्ये उपचार घेणारा येरवडा कारागृहातील कैदी ललित पाटील याला अमली पदार्थ देण्यात येणार असल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यानंतर पाटील ससून रुग्णालयातील उपचार कक्षातून गेल्या सोमवारी (२ ऑक्टोबर) पसार झाला. पाटीलला पुण्याबाहेर मोटारीतून सोडण्यात आले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. तपासात ही बाब उघडकीस आली. त्यानंतर डोकेला पोलिसांनी अटक केली, अशी माहिती बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.

हेही वाचा – लोणावळ्यात दोन नेपाळी तरुणांचा तलावात बुडून मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले तरुण

हेही वाचा – पुणे : दीपबंगला चौकात मोटारीवर आदळून दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू

ससूनमध्ये पाटीलशी ओळख

शिक्षण संस्थाचालकावर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. त्यावेळी शिक्षण संस्थाचालक ससूनमध्ये उपचार घेत होता. शिक्षण संस्था चालकाच्या मोटारीवरील चालक दत्ता डोके याची अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलशी रुग्णालयात ओळख झाल्याचे तपासात उघडकीस आले. डोकेला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Datta doke who leave drug trafficker lalit patil out of pune was arrested pune print news rbk 25 ssb