लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांची बुधवारी भेट घेतली. त्यामुळे इंदापूरनंतर महायुतीला दौंड विधानसभा मतदारसंघात धक्का बसण्याची शक्यता आहे.

mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Manifesto Mira Bhayander, Mira Bhayander,
मिरा भाईंदरसाठी महाविकास आघाडीचा जाहीरनामा; रेल्वे टर्मिनस, दिवाणी न्यायालयाची घोषणा
Ajit Pawar on Udyanraje Bhosale
Ajit Pawar: ‘साताऱ्याला पिपाणीनं वाचवलं, नाहीतर…’, अजित पवारांच्या मिश्किल टिप्पणीनं भाजपाचीच कोंडी
Amit Shah made special mention of Devendra Fadnavis in speech in shirala
अमित शहांनी फोन काढला आणि थेट फडणवीसांना लावला… म्हणाले, “पुन्हा…”
Sunil Tatkare on Jayant Patil
“जयंत पाटील आतल्या गाठीचे, त्यांनी…”, अजित पवार गटाकडून टीका; म्हणाले, ‘यावेळी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार’
sharad pawar reaction on bjp batenge to katenge slogan
भाजपाच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ घोषणेवरून शरद पवारांचा हल्लाबोल; म्हणाले, “सत्ताधाऱ्यांची मानसिकता…”
guruji Nitesh Karale concern over giving opportunity to mp Kale wife Mayura Kale in Maharashtra
Video : कराळे गुरूजींची स्वपक्षीय खासदाराबद्दल ‘खदखद’,काय म्हणाले  ?

दौंड मतदारसंघात महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पक्षाचा असेल, हे जवळपास स्पष्ट झाले आहे. राहुल कुल हे विद्यमान आमदारच पुन्हा उमेदवार असतील, असे म्हटले जाते. मात्र, या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे रमेश थोरातही इच्छुक होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर थोरात यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, दौंड मतदारसंघ मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून थोरात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करतील, अशी चर्चा सुरू झाली होती. थोरात यांनी स्वत:ही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात जाणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर शरद पवार बुधवारी बारामतीच्या दौऱ्यावर असताना थोरात-पवार भेट झाली.

आणखी वाचा-बारामतीच्या उमेदवाराची आठवडाभरात घोषणा; युगेंद्र पवार यांची माहिती

थोरात हे अजित पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडे दौंडमध्ये सक्षम उमेदवार नसल्याने थोरात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात गेल्यास त्या पक्षाकडून यांची उमेदवारी निश्चित मानली जाते.

‘माढ्या’चे आमदार बबन शिंदेही पवारांच्या भेटीला

माढा मतदारसंघाचे आमदार बबन शिंदे यांनीही बारामती येथे शरद पवार यांची भेट घेतली. बबन शिंदे हेही राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून, येत्या काही दिवसांत त्यांचा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, लोकसभा निवडणूक निकालात वरचष्मा राहिल्याने राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील अनेक नेत्यांची चढाओढ सुरू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनीही गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातील नेत्यांसह भाजपच्या काही नेत्यांनाही पक्षात प्रवेश दिला आहे. तर, अजित पवार यांच्या काही समर्थक आमदारांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे.