पिंपरी : काळानुरुप वडीलधा-यांनी सत्तरच्या पुढे गेल्यानंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे. परंतु, काही-काही जण ऐकत नाहीत. हट्टीपणा करतात. एवढा हट्टीपणा कशासाठी, दुस-याला जमणार नाही का, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करुन दाखविले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. मला कोणाचाही अपमान करायचा नसल्याचे असेही ते म्हणाले.
मावळ तालुक्यातील कान्हे उपजिल्हा रुग्णालयाचे लोकार्पण आणि विविध विकास कामांचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते झाले. आमदार सुनील शेळके, माजी आमदार रुपलेखा ढोरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, माऊली दाभाडे यावेळी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, की कासारसाई येथील श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना ऊसाला २८५० रुपये दर देतो. तर, बारामतीमधील सोमेश्वर ३५७१ आणि माळेगाव कारखान्याने ३६७१ रुपये दर दिला आहे. अशा पद्धतीने संस्था चालवायच्या असतात.
हेही वाचा >>> पिंपरी : वडिलधाऱ्यांनी वयाच्या सत्तरीनंतर मुलांकडे जबाबदारी दिली पाहिजे; अजित पवार यांचा शरद पवार यांच्यावर निशाणा
मी नाना नवले यांनाही याबाबत सांगत असतो. तुम्ही आता वयस्कर झालेले आहेत. कोणाकडे तरी जबाबदारी द्यावी लागेल. कधी देणार, आम्ही म्हातारे झाल्यावर जबाबदारी देणार का, प्रपंच करत असताना काळानुरुप वडीलधा-यांनी सत्तरच्या पुढे गेल्यानंतर मुलांकडे जबादारी दिली पाहिजे. परंतु, काही-काही जण ऐकत नाहीत. एवढा हट्टीपणा कशाला, दुस-याला जमणार नाही का, आम्ही त्यांच्यापेक्षा चांगले करुन दाखविले आहे. आम्ही जे बोलतो, ते करतो. मला कोणाचा अपमान करायचा नाही. त्यांनी कारखाना उभा केला. त्यांच्याबद्दल कौतुक, आदर आहे. पण, काळानुरुप बदलले पाहिजे. तरुणांकडे जबाबदारी दिली पाहिजे.
हेही वाचा >>> विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पाऊल! स्कूलबस, व्हॅनवर कारवाईचा दंडुका; शाळांवरही होणार कारवाई
लाडकी बहिण योजनेतून राज्यातील अडीच लाख उत्पन्न असलेल्या सर्व समाजातील महिलांना ओवाळणी टाकली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्याचे पैसे दहा ऑक्टोबरच्या आत महिलांच्या खात्यावर येतील हा माझा वादा असल्याचेही पवार म्हणाले.
गैरसमज करुन घेऊ नका
महायुतीमधील पदाधिकाऱ्यांनी एकमेकांबद्दल गैरसमज तयार करुन घेऊ नयेत. भांड्याला भांडे लागते. प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे. परंतु, ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम इमाने-इतबारे करायचे, असेही पवार म्हणाले.