पुणे : मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या मार्गिकेचा स्वारगेटपासून पुढे कात्रजपर्यंत विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारित मार्गिकेला केंद्र सरकारची मान्यता मिळाल्यानंतर राज्य शासनाकडून त्यांच्या हिश्श्याचा निधी तातडीने दिला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
मेट्रो मार्ग आणि नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीसंदर्भात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार सुनील टिंगरे, भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त राहुल महिवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक अतुल गाडगीळ या वेळी उपस्थित होते.
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गाच्या प्रगतीबाबत माहिती दिली. या मार्गाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाकडे तो मंजुरीसाठी पाठविण्यात आली. केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मान्यता मिळाल्यानंतर मेट्रो मार्गिकेचे काम सुरू करण्यात येईल, असे हर्डीकर यांनी सांगितले.
स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गासाठी केंद्र शासन स्तरावर आवश्यक मान्यतेसाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे. या मेट्रो मार्गावरील स्थानके अत्याधुनिक सुविधांनी युक्त करण्यात येतील. रामवाडी येथून विमानतळापर्यंत मेट्रोची सुविधा देण्याचे विचाराधीन आहे, असे पवार यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : पिंपरीतील नाट्यसंमेलनासाठी ‘डीपीसी’तून २० लाखांचा निधी – अजित पवार यांची माहिती
दरम्यान, नगर रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी तेथील रस्ते आणि पुलांच्या कामांना गती द्यावी. संगमवाडी ते खराडी रस्त्याचे भूसंपादन करण्याची कार्यवाही लवकर करावी. नगर रस्ता परिसरातील अतिक्रमण काढण्याची कार्यवाही करावी, अशी सूचनाही त्यांनी महापालिका प्रशासनाला केली.