विद्येचं माहेरघर असलेलं पुणे शहर पोर्श कारच्या अपघाताने हादरलं आहे. पोर्श कारच्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. या कारने धडक देणारा मुलगा अल्पवयीन बेदरकारपणे कार चालवत होता. त्याने दिलेल्या कारच्या धडकेमुळे अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघेजण ठार झाले आहेत. त्याला १५ तासांच्या आत जामीनही मिळाला. रविवारी ही घटना घडली. त्यानंतर आता आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यात पोहचले आहेत. पुण्यातल्या आयुक्तालयात त्यांनी बैठक घेतली आणि आत्तापर्यंत जे घडलं त्याचा आढावा घेतला. तसंच त्यांनी या प्रकरणी पुढील कारवाईचे निर्देश दिले आहेत. पुण्यातल्या पोर्श कारच्या या अपघात प्रकरणी गृहमंत्री अॅक्शन मोडवर असल्याचं दिसून आलं.

देवेंद्र फडणवीस यांनी घेतली बैठक

देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात पोहचून तातडीने पोलीस आयुक्ताला भेट दिली आणि पोलिसांसह बैठक घेतली. पोर्श कार चालवून दोघांना धडक देऊन ठार करणाऱ्या मुलाला जामीन मिळाल्याने सोशल मीडियातून आणि समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. गरीबांचा जीव स्वस्त झाला आहे का? बड्या उद्योजकांसाठी प्रशासन मवाळ का असा प्रश्न विचारण्यात येतो आहे. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात पोहचून पोलिसांची तातडीची बैठक घेतल्याचं कळतं आहे. तसंच या प्रकरणात कुणाचीही गय करु नका असेही आदेश दिल्याचं कळतंय.

Image Of Devendra Fadnavis And Eknath Shinde
Devendra Fadnavis : “आता फडणवीस त्याचे उट्टे काढत आहेत”, ठाकरेंच्या खासदाराचे शिंदे-फडणवीस यांच्याबाबत खळबळजनक दावे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Mahakumbh :
Mahakumbh : महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीची एक घटना घडली की दोन? सखोल चौकशी करण्याची पोलिसांची माहिती
SIT probes conspiracy against Devendra Fadnavis Eknath Shinde Mumbai news
फडणवीस, शिंदेंविरोधातील कारस्थानाची ‘एसआयटी’ चौकशी; खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रकरण
Devendra Fadnavis On Ramdas Kadam
मविआच्या काळात फडणवीस-शिंदेंना अटक करण्याचा कट रचला गेला का? महायुती सरकारकडून तपासासाठी SIT स्थापन
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘४६ कोटींची बिलं, अवैध राखेचे साठे, एका पोलिसाकडे १५ जेसीबी अन् १०० हायवा’, सुरेश धस यांचे गंभीर आरोप
Aniket Tatkare
अनिकेत तटकरेंकडून एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा ‘गद्दारांचा बादशाह’ असा उल्लेख, महायुतीत जुंपली; मंत्र्याकडून राजीनाम्याची तयारी

नेमकी घटना काय घडली?

पुण्यातल्या कल्याणी नगर भागात भरधाव पोर्श कारच्या धडकेत आयटी कंपनीत काम करणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. कारचालक हा पुण्यातली बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे. त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं होतं पण तो साडेसतरा वर्षांचा असल्याने त्याला जामीन देण्यात आला. ज्यानंतर संताप व्यक्त होतो आहे. पोलिसांनी कारचालकाला म्हणजेच त्या अल्पवयीन मुलाला पिझ्झा आणि बर्गर आणून दिल्याचा आरोप विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी केला. तसंच पुण्यातल्या तरुणांनी एकत्र येत पोलिसांच्या वागणुकीचा निषेध नोंदवला. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांशी संवाद साधला होता. आज देवेंद्र फडणवीस हे थेट पुण्यात पोहचले आहेत त्यांनी या प्रकरणाचा आढावा घेतला आहे. तसंच कुठल्याही दबावाची पर्वा न करता कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणी राजकीय दबावाची पर्वा न करता कारवाई करा असे निर्देश दिले आहेत.

हे पण वाचा- Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..

या सगळ्या अपघात प्रकरणावर तरुणाई प्रश्नचिन्ह उपस्थित करत असताना उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत. कायद्याने जे शक्य आहे ते सगळं काही करा असे आदेश त्यांनी सोमवारीच पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहेत. आज अचानक त्यांनी पु्ण्यातील पोलीस आयुक्तालयाला भेट दिली. या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली आहे.

Story img Loader