पुणे : राज्याच्या अर्थव्यवस्थेत पुण्याला महत्वाचे स्थान आहे. पुणे, मुंबईसारख्या शहरातील आव्हाने वाढत आहे. नागरिकरण वेगाने वाढत आहे. महानगरातील आव्हाने पेलण्यासाठी पोलीस दलाचे आधुनिकरण करण्यात येत असून कार्यपद्धतीत गुणात्मक बदल करण्यात आला आहे, असे मत उपमुख्यमंंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केले. महिला, ज्येष्ठ नागरिक, तसेच बालकांवरील अत्याचार प्रकरणात त्वरीत कारवाई करण्यात यावी, तसेच अमली पदार्थ तस्करांचा बिमोड करण्याचे आदेशही फडणवीस यांनी दिले. अमली पदार्थ तस्करीत पोलीस सामील असल्याचे आढळून त्याला थेट पोलीस दलातून बडतर्फ करण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पुणे : बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरण; तपासाबाबत गृहमंत्र्यांकडून पुणे पोलिसांचे कौतुक

पुणे शहरात नव्याने बसविण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे, तसेच पुणे पोलीस दलात सात नवीन पोलीस ठाणी, पिंपरी पोलीस आयुक्तालयातील चार नवीन पोलीस ठाणी, मीरा भाईंदर पोलीस आयुक्तयालायतील एक पोलीस ठाण्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. पुणे, पिंपरी पोलीस आयुक्तयालयातील नवीन इमारतीस मान्यता देण्यात आली आहे. या कामाचे भूमीपूजन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, माजी आमदार सिद्धार्थ शिरोळे, भीमराव तापकीर, सुनील टिंगरे, अमित गोरखे, उमा खापरे, तसेच पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरीचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा >>> पिंपरी : पोलीस आयुक्तालयाचे मुख्यालय ‘येथे’ होणार; बुधवारी मागणी आणि गुरुवारी ताथवडेतील २० हेक्टरचा मिळाला भुखंड

पोलीस दलाची रचना, मनुष्यबळ, तसेच पायाभूत सुविधांबाबतचा आकृतीबंध १९६० मध्ये करण्यात आला होता. त्यानंतर २०२३ मध्ये मी नवीन आकृतीबंध तयार केला. पुणे, मुंबई शहराचा विस्तार वाढत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात तर नागरिकरणाचा वेग वाढत आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलात आधुनिकीकरण करणे महत्वाचे आहे. महिला, ज्येष्ठ, बालकांच्या तक्रारी सोडविण्यास प्राधान्य द्यावे. गुन्ह्यांची संख्या वाढली तरी चालेल. मात्र, सामान्यांना न्याय देणे महत्त्वाचे आहे. पोलीस दलाला आधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोलिसांच्या कार्यपद्धतीत गुणात्मक बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. गृहमंत्रीपद भूषविताना ४० हजार पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करण्यात अलाी, हा एकप्रकारचा विक्रम आहे. पोलीस दलाला एवड्या मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध करून देणे हा विक्रमच मानला पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा

सायबर गुन्हे वाढत आहे. चोरट्यांकडून सामान्यांची फसवणूक केली जाते. सायबर गुन्ह्यांची उकल करण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलीस दलाल अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करून देण्यात अली आहे. अशा प्रकारची यंत्रणा देशात फक्त महाराष्ट्र पोलीस दलाकडे उपलब्ध असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेची पुनर्रचना

पुणे शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे. वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत मोठे फेरबदल करण्यात येणार आहे. एक अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह दोन पोलीस उपायुक्त वाहतूक शाखेची जबाबदारी सांभाळणार आहेत, अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

फडणवीसांकडून ‘अजित दादांचे’कौतूक

पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आधुनिक, सर्व सोयींनी सुसज्ज इमारत बांधण्यात येणार आहेत. पुणे पोलीस आयुक्तयातातील इमारत कशी असावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठपुरावा केला. या इमारतीचे संकल्प चित्र पवार यांनी जातीने लक्ष घालून तयार केले. पुण्यातील नवीन पोलीस आयुक्तालयाची इमारतीच्या कामकाजात पवार यांनी सातत्य्ाने पाठपुरावा केला. त्यांना स्थापत्य अभियांत्रीकी क्षेत्राविषयी असलेली जाण कौतुकास्पद आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणीवस यांनी अजित पवार यांचे कौतूक केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dcm devendra fadnavis order police to solve complaints of women on priority print news rbk 25 zws