नारायणगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यात लक्ष केंद्रित केले असून येणाऱ्या शुक्रवारी ( दि. २८ ) साय. ४.३० वा. नारायणगाव येथे शिवसेना मेळाव्यात जुन्नरचे अपक्ष आ. शरद सोनवणे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार माजी आमदार बाळासाहेब दांगट , पुणे जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराम लांडे , ठाकरे गटाचे नारायणगावचे उपसरपंच योगेश पाटे , माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसन्ना डोके आदी सह लोकसभा मतदार संघातील विविध पक्षातील ४०० कार्यकर्ते,पदाधिकारी यांचेसह शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने विशेष करूनं ठाकरे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडणार आहे .
दरम्यान , पुणे जिल्ह्यात युती न करता स्वतंत्र्यरित्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , नगर परिषद निवडणूक लढविणार असल्याची माहिती आ. शरद सोनवणे यांनी नारायणगाव येथील पत्रकार परिषदेत दिली . यावेळी उपसरपंच योगेश उर्फ बाबू पाटे , माजी उपसरपंच संतोष वाजगे , आरिफ आतार ,विकास तोडकरी , गणेश पाटे , ऍड. राजेंद्र कोल्हे , हेमंत कोल्हे , अजित वाजगे , संतोष दांगट , भाऊ मुळे , नंदू अडसरे ,संदीप गांधी , अक्षय वाव्हळ , अजित कोऱ्हाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार सोनवणे म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४.३० वा. रोजी नारायणगाव येथे शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री शिंदे हे हेलिकॉप्टरने २८ फेबुवारीला जुन्नर येथे येणार आहेत नंतर गोद्रे येथील जगातील सर्वात मोठा छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळा उभारणी कामाला भेट देतील , नंतर चाळकवाडी येथील आमदार सोनवणे यांच्या राजगड येथे कार्यालयाला भेट देऊन नारायणगाव येथील शिवसैनिकाच्या मेळाव्यास ते मार्गदर्शन करणार आहेत ,या मेळाव्यात शिरूर मतदार संघातील जुन्नर , आंबेगाव , खेड , शिरूर या तालूक्यातील ४०० हून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत , अशी माहिती आ. सोनवणे यावेळी स्पष्ट केले. राज्य पातळीवर युती आहे मात्र हि युती स्थानिक निवडणुकीमध्ये राहणार नाही , येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती , जुन्नर नगरपरिषद या स्वबळावर आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या विरोधात लढविल्या जातील, असे आ. सोनवणे यांनी स्पष्ट केले.