पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (वायसीएम) कचरा कुंडीत एक मृत अर्भक सापडले आहे. हे अर्भक रुग्णालयात प्रसूती झालेल्या महिलेचे आहे की बाहेरून कोणी टाकले आहे याचा सीसीटीव्ही कॅमे-याद्वारे शोध घेतला जात आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी अकरा वाजता उघडकीस आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> पुणे: पत्नीला तोंडी तलाक देणाऱ्याविरुद्ध गुन्हा

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाच्या आउटगेट येथे दोन कचरा कुंड्या आहेत. कचरा उचलण्याचे काम सुरू असताना एका कचरा कुंडीत अर्भक सापडले. मुलगी असून अंदाजे सात महिन्यांचे असेल.  अर्भक सापडले त्यावेळी मृत झालेले होते. काल रात्री बाहेरून कोणी तरी कचरा कुंडीत टाकून गेल्याची शंका उपस्थित केली जात आहे. रुग्णालयातील अर्भक आहे की बाहेरून आणून कचरा कुंडीत टाकले आहे? याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जात आहेत. शुक्रवार सकाळपासूनचे फुटेज तपासण्यात येत असल्याचे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले. त्यानंतरच हे बाळ कचरा कुंडीत कोणी टाकले, कोणाचे आहे हे समोर येईल.