लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: वानवडी परिसरातील साळुंखे विहार कचराकुंडीजवळ पुरूष जातीचे मृत अर्भक फेकून दिल्याची घटना गुरुवारी (१५ जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास  उघडकीस आली. अनैतिक संबंधातून अर्भक जन्मले असल्याने त्याला फेकून दिल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Ramesh Chennithala Nana Patole
Congress : बंडखोरांविरोधात काँग्रेस अ‍ॅक्शन मोडवर, मतदानाच्या १० दिवस आधी १६ जण निलंबित
Germanys Warren Buffett Karl Hellerding
जर्मनीचा वॉरेन बफे : कार्ल हेलरडिंग
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?

याप्रकरणी पोलीस अमलदार दिनेश जाधव यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साळुंखे विहार कचराकुंडीजवळ १५ जून रोजी पुरूष जातीचे अर्भक असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाव घेत अर्भकाला ताब्यात घेत ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक जयंत जाधव तपास करीत आहेत.