राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (एनएमएमएस), अपंग विद्यार्थ्यांसाठीची मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीची बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती आता राज्य शासनाच्या शिक्षण योजना संचालनालयातर्फे राबवल्या जात आहेत. या शिष्यवृत्तीच्या अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, आता विद्यार्थ्यांना ३१ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल.शिक्षण योजना संचालनालयाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिष्यवृत्ती योजनांची माहिती, पात्रतेचे निकष आणि अर्ज http://www.scholarships.in या संकेतस्थळावर देण्यात आले आहेत. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठीच्या प्री-मॅट्रिक शिष्यवृत्तीअंतर्गत नवीन विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्याचा धर्मनिहाय कोटा २,८५,४५१ निश्चित केला आहे. सद्यस्थितीत ३ लाख ८२ हजार ५१४ नवीन अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच नुतनीकरणासाठी ७ लाख २४ हजार ४९५ अर्ज नूतनीकरणासाठी प्राप्त झाले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना एक हजार ते दहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा