पुणे : व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्यासाठी २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने (एसीबी) अटक केली आहे. मंगळवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली. आशिष बंगिनवार असे अटक केलेल्या अधिष्ठात्याचे नाव आहे. महाविद्यालयात असलेल्या १५ टक्के व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे २० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यातील १० लाख रुपये स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी सुमारे १५ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या कोट्यातून प्रवेश मिळण्यासाठी २२ लाख रुपये शुल्क आहे. मात्र त्या व्यतिरिक्त २० लाख रुपये देण्याची मागणी बंगिनवार यांनी एका विद्यार्थिनीच्या पालकांकडे केली होती. त्यामुळे त्या विद्यार्थिनीच्या पालकांनी याबाबत एसीबीकडे तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एसीबीने बंगिनवार यांना ताब्यात घेण्यासाठी सापळा लावला होता. तक्रारदार यांच्याकडून पैसे स्वीकारताना त्यांना पकडले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dean pune municipal medical college arrested for taking bribe of 20 lakhs for admission pune print news rbk 25 ysh