शहरात स्वाईन फ्लूमुळे आणखी एकाचा बळी गेला आहे. यामुळे १ जानेवारीपासून शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांची संख्या ३३ झाली आहे. खेडमधील कोयाली येथे राहणाऱ्या अनिल मारुती आल्हाट (वय- ३३) यांचा शनिवारी स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. ते रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत होते. ६ ऑगस्ट रोजी त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान ‘नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’मार्फत (एनआयव्ही) करण्यात आले होते.
शहरात स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांपैकी ८ जण पुण्यातील होते. तर २५ जण बाहेरुन उपचारांसाठी आले होते. पुणे महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार १ जानेवारीपासून २२५ नागरिकांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान करण्यात आले. यांतील १७४ रुग्ण उपचारांअंती बरे झाले आहेत. सध्या शहरांतील विविध रुग्णालयांत स्वाईन फ्लूचे १८ रुग्ण उपचार घेत आहेत. यांतील १२ जणांना वॉर्डात दाखल करण्यात आले आहे, तर ६ जणांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा