पिंपरी-चिंचवडमध्ये भरधाव वेगातील मोटारीने तिघांना भीषण धडक दिली. या धडकेत एका ७ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर मोटरचालक तसाच पुढे भरधाव वेगात निघून गेला. मात्र, वाकड पोलिसांनी १०० पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. वाकड पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिक समाधान व्यक्त करत आहेत. मागील आठवड्यात ही घटना घडली आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या अपघातात कनवरलाल विष्णू गवळी आणि त्यांची पत्नी राजेश्री हे दोघे जखमी झाले, तर त्यांचा मुलगा संघर्षचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात वाकड पोलिसांनी तेजस शशिकांत बारसकर (वय १९) याला अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे पत्नी राजेश्री, मुलगा संघर्ष यांच्यासह पहाटेच्या सुमारास यवत येथे जात होते. त्यासाठी, काळेवाडी फाटा येथून ते इतर वाहनांनी जाणार होते. ते तिघे जण रिंग रोडच्या कडेने चालत जात असताना पाठीमागून भरधाव वेगातील मोटारीने त्यांना भीषण धडक दिली. यात कनवरलाल आणि त्यांच्या पत्नी काही प्रमाणात जखमी झाले. मात्र, या भीषण अपघातात मुलाला गंभीर दुखापत झाली. यानंतर मुलगा संघर्षला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

“अपघातानानंतर मोटार चालक काही अंतरावर जाऊन थांबला”

अपघातानानंतर मोटार चालक थांबला नाही, तो काही अंतरावर जाऊन थांबला आणि मोटारीला काही झालं आहे का? हे पाहात असल्याचा सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळालं. या घटनेप्रकरणी कनवरलाल यांनी वाकड पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

हेही वाचा : पुणे : मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी थेट दागिण्यांच्या दुकानात चोरी, हडपसरमध्ये २ भावी डॉक्टर गजाआड

अपघात पहाटे झाला असल्याने सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट दिसत नव्हते. त्यामुळं मोटारीचा एका बाजूला आरसा फुटला होता यावरून आणि इतर सीसीटीव्हीचा आधार घेऊन आरोपीपर्यंत वाकड पोलीस पोहचले. आरोपीपर्यंत पोहचण्यासाठी वाकड पोलिसांना १०० सीसीटीव्ही तपासावे लागले. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. 