लोणावळ्यातील भुशी धरणात बुडून मुंबईतील एका महाविद्यालयीन युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.रोहिन जोगिंदर लाहोट (वय १७, रा. घाटकोपर, मुंबई) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. दिवाळीनिमित्त रोहन त्याच्या शिकवणीतील शिक्षक, मित्र लोणावळा परिसरात पर्यटनासाठी आले होते. भुशी धरणात उतरलेल्या रोहनला पाण्याच्या खोलीचा अंदान न आल्याने तो बुडाला. या घटनेची माहिती मिळताच शिवदुर्ग रेस्क्यू पथकातील स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा >>>पुणे : पीएमपी बस प्रवासी ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरीला
सचिन गायकवाड, योगेश उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडू, अजय मयेकर आदींनी शोधमोहीम राबविली.पाण्यात बुडालेल्या रोहनला बाहेर काढण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. लोणावळा शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी शिंदे तपास करत आहेत.