विद्याविकास संस्कृत विद्यालयाचे संस्थापक लक्ष्मीकांत जांभोरकर (वय ८९) यांचे मंगळवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
संस्कृत भाषेच्या प्रसारासाठी जांभोरकर यांनी कार्य केले होते. नूमवी, मॉडर्न, आलेगावकर या शाळांमध्ये त्यांनी संस्कृत भाषेच्या अध्यापनाचे काम केले होते. त्यानंतर संस्कृत भाषेच्या प्रसाराच्या उद्देशाने संस्कृत विद्या शिक्षण संस्थेची आणि विद्याविकास संस्कृत विद्यालयाची स्थापना केली. या संस्थेने नुकताच सुवर्णमहोत्सव साजरा केला. याशिवाय आठवी ते दहावीसाठी संस्कृतची मार्गदर्शक पुस्तके त्यांनी लिहिली होती. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संस्कृत पाठय़पुस्तकाच्या निर्मितीमध्येही त्यांनी सहकार्य केले होते. केंद्रीय संस्कृत विद्यालयाकडूनही त्यांना गौरविण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा