आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुण्यातील बोपदेव घाटात मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार शिक्षिकेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुर्गा राजेंद्र येनपुरे (वय ५१, रा. साई किरण अपार्टमेंट, आंबेगाव-दभाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार महिलेचे नाव आहे.

याबाबत राजेंद्र येनपुरे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुर्गा येनपुरे एका शाळेत शिक्षिका आहेत. त्या दुचाकीवरून नातेपुते येथे नातेवाईकांकडे गेल्या होत्या.

हेही वाचा : पुण्यातील कागत्र भागात भिंतीवर डोके आपटून तीन वर्षांच्या बालिकेचा खून, सावत्र वडील अटकेत

शनिवारी (१६ एप्रिल) सकाळी ११ वाजल्याच्या सुमारास त्या दुचाकीवरून पुण्याकडे जात होत्या. त्यावेळी येनपुरे यांच्या दुचाकीला भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातानंतर मोटारचालक पसार झाला. सहायक फौजदार प्रताप डोईफोडे या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death of woman teacher due to hitting of vehicle in bopdev ghat pune print news pbs