रात्रगस्तीवरील महिला पोलीस अधिाकाऱ्यास धमकी देऊन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली. घोरपडे पेठेतील महापालिका वसाहत परिसरात ही घटना घडली.रवींद्र उर्फ सोन्या संजय खंडागळे (रा. पीएमसी काॅलनी, घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक गिरीजा म्हस्के यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>पुण्यात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन; राज्यसेवा मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्याची मागणी

सहायक निरीक्षक म्हस्के रात्रगस्तीवर होत्या. घोरपडे पेठेतील महापालिका वसाहत परिसरात आरोपी खंडागळे थांबला होता. तु माझ्या भावाच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी खोटा गुन्हा दाखल केला आहे. मी तुला सोडणार नाही, अशी धमकी खंडागळेेने सहायक निरीक्षक म्हस्के यांना दिली.खंडागळेने आरडाओरडा करुन शिवीगाळ केली. शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी खंडागळेला अटक करण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death threat to female police officer in ghorpade peth pune print news rbk 25 amy