पिंपरी : तळवडे येथील केकवर लावायच्या शोभेच्या फटाक्याच्या (स्पार्कल कँडल) मेणबत्ती कंपनीतील स्फोटातील जखमींपैकी एका महिलेचा शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या बारा झाली आहे. सुमन गोधडे (वय ४०) यांचे रात्री दोन वाजता ससून रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तळवडे येथील मेणबत्ती कंपनीत आठ डिसेंबर रोजी घडलेल्या आग दुर्घटनेत सहा महिलांचा घटनास्थळी मृत्यू झाला होता. तर, दहा जण जखमी झाले होते. जखमींना पुढील उपचारांसाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्यातील प्रतीक्षा तोरणे (वय १६ ) आणि कविता राठोड (वय ४५) यांचे नऊ डिसेंबर रोजी तर शिल्पा राठोड (वय ३१) यांचे दहा डिसेंबर रोजी ससून रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. तर प्रियंका यादव (वय ३२) आणि अपेक्षा तोरणे (वय १८ ) यांचे १४ डिसेंबर रोजी उपचारादरम्यान निधन झाले.

हेही वाचा – पिंपरी : ‘टीडीआर’ घोटाळ्यात पिंपरी-चिंचवडमधील तीन आमदार? महाविकास आघाडीच्या आरोपाने राजकीय वातावरण तापले

हेही वाचा – पुणे : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेला ‘आरपीएफ’मधील हवालदार अखेर गजाआड

आज आणखी एक जखमी महिलेचे निधन झाल्याने तळवडे आग दुर्घटनेतील आतापर्यंतच्या मृतांची संख्या बारा इतकी झाली आहे. या घटनेतील जखमी रुग्ण उषा पाडवी, कोमल चौरे, रेणुका ताथोड आणि शरद सुतार यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Death toll in talwade tragedy is twelve the woman died during treatment pune print news ggy 03 ssb