पुणे : महाराष्ट्राची वेगाने प्रगती होत असताना शेजारील कर्नाटक राज्य कर्जबाजारी झाले आहे. ‘आयटी हब’ असलेल्या बंगळुरु शहराच्या विकासासाठी सरकारकडे पैसा शिल्लक नाही. चुकीचे सरकार निवडून दिल्यानंतर काय परिणाम होतात, हे यातून दिसत आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या कर्नाटकमधील काँग्रेस सरकारवर टीका केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खोटय़ा आणि चुकीच्या घोषणा देऊन सरकारने तिजोरीला हात घातला आहे. कर्नाटकप्रमाणेच राजस्थानही कर्जबाजारी झाले असून, विकासकामे ठप्प झाली आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला. पुणे शहरातील वनाज ते रुबी हॉल आणि पिंपरी-चिंचवड ते शिवाजीनगर या मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी झाले. याशिवाय पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना त्यांच्या हस्ते चाव्या देण्यात आल्या. तसेच  पिंपरी-चिंचवड येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.

ते म्हणाले, देशाच्या प्रगतीमध्ये राज्याचा मोठा वाटा आहे. त्याचा फायदा पुण्याला होत आहे. राज्याची प्रगती वेगाने होत असताना शेजारील कर्नाटकमध्ये बेंगलुरू शहराच्या विकासासाठी पैसे नाहीत. पक्षस्वार्थासाठी तिजोरीला हात घातला जातो, तेव्हा त्याचा युवा पिढीच्या भवितव्यावर परिणाम होतो. चुकीचे सरकार निवडून दिल्यानंतर त्याचे परिणाम कर्नाटकमध्ये दिसत आहेत. हीच परिस्थिती राजस्थानमध्ये आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debt on karnataka rajasthan due to electing wrong government prime minister narendra modi criticizes congress ysh
Show comments