आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे : नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन रस्ता) परिसरातील पदपथावर बेकायदा पथारीवाल्यांविरुद्ध कारवाई करणाऱ्या अतिक्रमण विभागातील पथकाला धक्काबुक्की केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी महिलेसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली होती.

हेही वाचा >>> बांधकाम व्यावसायिकावर कुऱ्हाडीने वार करणाऱ्या तरुणाला सक्तमजुरी; न्यायालयाकडून आरोपीला पाच लाखांचा दंड

याबाबत महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी सचिन घेंगे (वय २९, रा. मांजरी) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फर्ग्युसन रस्त्यावरील पदपथावर बेकायदा पथारी थाटण्यात आल्या आहेत. या भागात फेरीवाल्यांकडून बेकायदा व्यवसाय केला जातो. पादचाऱ्यांना पदपथावरुन चालता देखील येत नसल्याने महापालिकेकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून बेकायदा पथारी व्यावसायिक, फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याथ आली आहे.

हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडमध्ये वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशी, रोहिंग्याना पकडले; सर्वाधिक बांगलादेशी भोसरीमध्ये!

सोमवारी सायंकाळी फर्ग्युसन रस्त्यावरील सागर आर्केड परिसरात बेकायदा फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी महिलेसह चौघांनी अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करुन शिवीगाळ केली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deccan police registered case against four including woman for allegedly assaulting anti encroachment squad pune print news rbk 25 zws