पुणे : ‘तेर पोलिसी सेंटर’तर्फे देण्यात येणाऱ्या ‘डॉ. ए. पी. जे. कलाम युवा संशोधक पाठ्यवृत्तीसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता युवा संशोधकांना येत्या ३१ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येईल. संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉ. विनिता आपटे यांनी ही माहिती दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तरुणांच्या कल्पकतेला वाव देणे, नवोदित संशोधकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही पाठ्यवृत्ती सुरू करण्यात आली. यंदा पाठ्यवृत्तीचे सहावे वर्ष आहे. सर्वोत्कृष्ट युवा संशोधकांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपये पाठ्यवृत्ती म्हणून दिले जातील. अधिक माहिती http://www.drkalamfellowship.com/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

हेही वाचा – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत रविवारी पुण्यात, प्रसाद प्रकाशनाच्या अमृतमहोत्सवी सांगता समारंभाला राहणार उपस्थित

नवोदित संशोधक, महाविद्यालयीन तरुणांमध्ये नवे काही करून पाहण्याची ऊर्मी असते. मात्र, त्यांना आर्थिक पाठबळ मिळत नाही. त्यामुळे संशोधन क्षेत्रात आश्वासक तरुणांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ही पाठ्यवृत्ती सुरू करण्यात आली. डॉ. कलाम यांच्या नावाच्या या पाठ्यवृत्तीने नवोदित संशोधकांना प्रेरणा मिळण्याचा उद्देश आहे, असे डॉ. आपटे यांनी नमूद केले.