टाटा-एस.बी.आय. क्रेडिट पोर्टलवरील खाते हॅक करून एक लाख चौदा रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजेशकुमार मुरारीप्रसाद सिंग (वय ३१, रा. रामविजय अपार्टमेन्ट, रहाटणीगाव) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंग यांचे टाटा-एस.बी.आय. क्रेडिट पोर्टलवर खाते आहे. इंटरनेट बँकींगद्वारे त्यांचे खाते हॅक करून त्याचा ईमेल आणि मोबाईल क्रमांक बदलला. नऊ वेळा त्यांच्या खात्यावरील पैसे काढून घेतले. सिंग यांची एक लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी आयटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करून अधिक तपास पोलीस निरीक्षक बी. एस. सोनवणे करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
 

 

 
 
 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deception of rs 1 lac through internet banking
Show comments