राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आल्याने शाळांच्या वेळेसंदर्भात जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा काही ठिकाणी शाळा विलंबाने सुरू झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी, अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेण्यासाठी एप्रिलअखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांत उन्हाच्या तीव्र झळा सहन कराव्या लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, शाळांच्या वेळेसंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याची सूचना देण्यात आली आहे. 

काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्याच्या अनुषंगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून जिल्हा पातळीवर निर्णय घ्यावा, अशा सूचना राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिल्या आहेत.

शालेय शिक्षण विभागाने एप्रिल अखेरपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षक, पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एप्रिलमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पूर्णवेळ शाळा सुरू ठेवणे कठीण असल्याची भूमिका मांडण्यात आली होती.