लोकसत्ता प्रतिनिधी

पिंपरी: महापालिका प्रशासनाने २०२३-२४ या आर्थिक वर्षातील मालमत्तांवरील सामान्य करातील विविध सवलती जाहीर केल्या आहेत. त्यात महिलांच्या नावाने असलेल्या मालमत्तेवर सामान्य करात ३० टक्के, दिव्यांगाना ५० टक्के, तर माजी सैनिकांना शंभर टक्के सवलत लागू आहे. गतवर्षी लाभ घेतलेल्या महिला, दिव्यांग आणि माजी सैनिकांना नव्याने अर्ज करण्याची गरज नाही. नागरिकांना ३० जूनपर्यंत कर भरुन सवलतीचा लाभ घेता येणार आहे.

Discrimination by Mumbai Municipal Corporation,
वैद्यकीय विमा योजनेत मुंबई महापालिकेची सापत्न वागणूक, खर्चावरील मर्यादा निश्चितीमुळे कर्मचारी नाराज
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
धारावीकरांसाठी देवनारमध्येही भूखंड; क्षेपणभूमीची १२५ एकर जागा देण्याचा राज्य सरकारचा निर्णय
slum Dharavi, House slum dwellers Dharavi,
धारावीतील सर्व अपात्र झोपडीवासीयांना घरे! शासनाकडून धोरण जाहीर
insurance companies
आयुर्विमा कंपन्यांच्या पहिल्या हप्त्यापोटी उत्पन्नांत १४ टक्के वाढ, ‘एलआयसी’ची हिस्सेदारी ५८ टक्क्यांवर
IPO
जागतिक स्तरावर आयपीओच्या माध्यमातून ८२२ कंपन्यांकडून ६५ अब्ज डॉलरची निधी उभारणी
anganwadi workers announce chakka jam protest on 1 october across maharashtra
राज्यातील अंगणवाडी सेविका १ ऑक्टोबरला करणार चक्का जाम

शहरात पाच लाख ९७ हजार ७८५ मालमत्ता आहेत. त्यातून मागील आर्थिक वर्षात ८१७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला. याच अनुषंगाने २०२३-२४ या आर्थिक वर्षात एक हजार कोटींचा टप्पा गाठण्याचे उदिष्ट विभागाने ठेवले आहे. त्यासाठी सर्व सेवा सुविधा ऑनलाइन उपलब्ध करून दिल्या आहेत. शहरातील पर्यावरण पूरक हौसिंग सोसायट्यांनी सवलतीचा लाभ घेण्यासाठी लवकरात-लवकर अर्ज करावेत. जेणेकरून अशा सोसायट्यांना आगाऊ कर भरण्याचा आणि पर्यावरण पूरक सवलतीचा एकत्रित लाभ घेता येईल.

आणखी वाचा- पुणे : व्यवसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या सावकारांना बेड्या; पिस्तुलाच्या धाकाने अपहरण करून उकळले पैसे

आगाऊ मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी सामान्य करात पाच टक्के, फक्त महिलांचे नाव असलेल्या निवासी घरास ३० टक्के, ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असणाऱ्या अंध, अपंग, मतिमंद, कर्णबधीर व मूकबधीर यांच्या नावावर असणाऱ्या मालमत्तेस ५० टक्के, स्वातंत्र्य सैनिक किंवा त्यांचे पत्नी यांचे यांच्या एका निवासी घरास ५० टक्के, ऑनलाइन पेमेंट गेट वे, आरटीजीएस, नेफ्टद्वारे भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना ३० जूनपर्यंत पाच टक्के तर जुलै ते सप्टेंबर अखेर पर्यंत भरणा करणाऱ्यांना चार टक्के सवलत मिळणार आहे.

इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास दोन टक्के सवलत

कंपोस्टींग यंत्रणा, सांडपाणी प्रकल्प,झिरो वेस्ट संकल्पना राबविणा-या सोसायट्यांना पाच ते दहा टक्क्यांपर्यंत सवलत आहे. माझी मालमत्ता माझी आकारणी योजनेअंतर्गत स्वयंस्फुर्तीने मालमत्ता कराची आकारणी करणाऱ्यांसाठी सामान्य करात दोन टक्के सवलत संपूर्ण वर्षासाठी आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारल्यास व इतर वाहनांसाठी चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यास वर्षासाठी करात दोन टक्के सवलत दिली जाते. प्रामाणिकपणे तीन वर्षे मालमत्ता कराचा भरणा करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून दोन टक्के ज्यादा सवलत आहे. संरक्षण दलातील शौर्य पदक धारक आणि माजी सैनिकांना मालमत्ताकरात (सामान्य कर, मलप्रवाह सुविधा लाभ कर, पाणी पुरवठा लाभ कर, रस्ता करात) शंभर टक्के सवलत आहे. चालू आर्थिक वर्षात आकारणी पुस्तकात नवीन नोंद होणाऱ्या निवासी, बिगरनिवासी, मिश्र, औद्योगिक, मोकळ्या जागा यांना सामान्य करात पाच टक्के सवलत आहे.

मालमत्ताधारकांनी ३० जूनपर्यंत संपूर्ण कराचा भरणा केल्यास किमान दहा टक्के व कमाल २० टक्के सवलत मिळते. त्याचा नागरिकांनी फायदा घेतला पाहिजे. त्यानंतर लागणारे महिना दोन टक्के विलंब शुल्क टाळण्यासाठी ३० जूनपूर्वी नागरिकांनी आगाऊ कराचा भरणा करावा. -शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका