पुणे : जिल्हाधिकारी यांनी जाहीर करण्यापूर्वीच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी समाजमाध्यमातून शाळांना शुक्रवारी (२६ जुलै) सुट्टी देण्याचा आग्रह जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवून केल्याचे जाहीर केले. प्रशासनाकडून शाळा सुटीचा निर्णय न घेतल्यास शाळा आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून अखेर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी हवामान विभागाशी चर्चा करून ; तसेच पालकमंत्री अजित पवार यांना कल्पना देऊन शाळांना सुटीचा निर्णय रात्री उशिरा जाहीर केला.

शहरासह जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत अतिमुसळधार पाऊस कोसळत असल्याने पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार गुरुवारी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली. मात्र, शुक्रवारी शाळांना सुटी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी हवामान विभागाचे कृष्णकांत होसाळीकर यांच्याशी सायंकाळी चर्चा केली. तेव्हा शुक्रवारी शाळांना सुटी देण्याची आवश्यकता नसल्याचे मत समोर आले. तरीदेखील जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी हवामान विभागाला शुक्रवारचा अचूक अंदाज देण्याबाबत सांगितले आणि त्यावर शुक्रवारी शाळांना सुटी द्यायची किंवा कसे, याबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे कळविले.

Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Buldhana ST, ST benefits , maharashtra Assembly elections ,
बुलढाणा : निवडणुकीमुळे एसटी महामंडळाचेही चांगभलं, तब्बल पाऊण कोटीचा…
Image of Manmohan Singh's sister
Manmohan Singh Death : मनमोहन सिंग यांच्या बहिणीची व्यथा, आजारपणामुळे घेता येणार नाही भावाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
11 thousand 500 students passed ca final examination conducted in November 2024 Mumbai
‘सीए’ अभ्यासक्रमाच्या परीक्षेचा निकाल जाहीर, ११ हजार ५०० विद्यार्थी ‘सीए’ म्हणून पात्र
Recruitment of various posts in the State Government Service of the State Public Service Commission MPSC
एमपीएससीच्या तेवीस परीक्षांसाठी पुन्हा अर्जाची संधी, तुम्ही अर्ज केला नसेल तर…
अमरावती : शेअर बाजारात नफ्याचे आमिष; तब्बल २१.९२ लाखांची…

हेही वाचा >>>पिंपरी-चिंचवडमधील १५ रस्त्यांवरील वाहतूक बंद, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन

दरम्यान, मुंबईहून पुण्याला केवळ अडीच तासांत हजर झालेले पालकमंत्री पवार यांनी महापालिकेत प्रशासनाकडून आढावा घेतला आणि आवश्यक सूचना केल्या. तसेच अधिकारी मला प्रत्यक्ष जागेवर दिसले पाहिजेत, असे सांगितले. त्यानंतर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी पालकमंत्री पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्र पाठवून सुटी जाहीर करावी, असे पत्र पाठविले आणि ते समाजमाध्यमात प्रसारित केले. सत्ताधारी लोकप्रतिनिधींनीही हे पत्र समाजमाध्यमात प्रसारित केले. त्यामुळे शाळा आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण होण्याची शक्यता असल्याने अखेर जिल्हाधिकारी यांनी भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली, खडकवासला परिसर, आंबेगाव, जुन्नर आदी तालुक्यांसह पुणे, पिंपरी-चिंचवड येथील सर्व शासकीय, खासगी, प्राथमिक, माध्यमिक शाळांना सुटी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.

Story img Loader