बारावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत तीन प्रश्न चुकले होते. विषय तज्ज्ञ आणि मुख्य नियामकांच्या संयुक्त सभेत या चुकलेल्या प्रश्नांबाबत चर्चा झाली. संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्य मंडळाने निर्णय घेतला असून, पोएट्री विभागातील अन्य कोणतेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यास, त्रुटी असलेल्या ए ३ ते ए ५ या प्रश्नांचे क्रमांक केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, उत्तरपत्रिकेत पोएट्री विभाग पोएट्री सेक्शन २ असा उल्लेख केला असल्यास प्रत्येक प्रश्नाला दोन या प्रमाणे सहा गुण दिले जाणार आहेत.
हेही वाचा- कसबा २८ वर्षांनंतर काँग्रेसच्या ताब्यात कसा गेला?
राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे संयुक्त सभा झाली नव्हती. संयुक्त सभा न झाल्याने इंग्रजीच्या चुकलेल्या प्रश्नांबाबत राज्य मंडळाने निर्णय घेतला नव्हता. अखेर बहिष्कार आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी संयुक्त सभा झाली. त्यात चुकलेल्या तीन प्रश्नांबाबतच्या सहा गुणांचा निर्णय घेण्यात आला.
हेही वाचा- बारावी गणिताची प्रश्नपत्रिका फुटली; सिंदखेडराजा येथील प्रकार, अर्ध्या तासातच समाजमाध्यमांवर प्रसारित
संयुक्त सभेच्या अहवालानुसार तीन परिस्थिती विचारात घेऊन विद्यार्थ्यांना गुण दिले जातील. त्यात पोएट्री विभागातील अन्य कोणतेही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला असल्यास, त्रुटी असलेल्या ए ३ ते ए ५ या प्रश्नांचे क्रमांक केवळ उत्तरपत्रिकेत नमूद केले असल्यास, उत्तरपत्रिकेत पोएट्री विभाग पोएट्री सेक्शन २ असा उल्लेख केला असल्यास प्रत्येक प्रश्नाला दोन या प्रमाणे सहा गुण दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.