प्रवाशांची मागणी लक्षात घेता पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई एक्स्प्रेस (झाँसी) या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. नव्या निर्णयानुसार आठवड्यातून एकदा धावणाऱ्या या गाडीला दोन्ही बाजूने मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.पुणे-वीरांगना लक्ष्मीबाई एक्स्प्रेस ही विशेष गाडी प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा >>>पुणे:‘पीएमपी’च्या ताफ्यात आणखी १०० गाड्या, संचालक मंडळासमोर लवकरच प्रस्ताव
या गाडीला दोन्ही बाजूने चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे स्थानकावरून प्रत्येक गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास वीरांगना लक्ष्मीबाई स्थानकासाठी गाडी सोडण्यात येत आहे. या गाडीला ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वीरांगना लक्ष्मीबाई-पुणे विशेष एक्स्प्रेसची मुदत २९ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. या गाडीला चार सर्वसाधारण, पाच शयन, पाच थ्री टायर एसी आणि एक द्वितीय वर्गाचा वातानुकूलित डबा असणार आहे.