पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाल्याने शहरातील पाणीकपात मागे घेण्यात आली असली तरी येत्या गुरुवारी (१० ऑगस्ट) संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या मार्फत नवे आणि जुने पर्वती जलकेंद्र, लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी पंपिंग आणि वडगाव जलकेंद्र येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली. शुक्रवारी (११ ऑगस्ट) सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.

पाणीपुरवठा बंद असणारा भाग पुढीलप्रमाणे :

शहरातील सर्व पेठा, दत्तवाडी परिसर, राजेंद्रनगर, लोकमान्य नगर, डेक्कन परिसर, शिवाजीनगर परिसर, स्वारगेट परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, काशेवाडी, क्वार्टरगेट परिसर, गंज पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरूण वैद्य स्टेडियम परिसर, घोरपडे पेठ, सहकारनगर, पद्मावती, बिबवेवाडी, मुकुंदनगरचा काही भाग, महर्षीनगर, गंगाधाम, चिंतापणी नगर भाग एक आणि दोन, लेक टाऊन, शिवतेजनगरग, अप्पर इंदिरानगर, लोअर इंदिरानगर, शेळकेवस्ती, महेश सोसायटी, बिबवेवाडी गावठाण, प्रेमनगर, आंबेडकरनगर, डायस प्लाॅट, ढोले मळा, सॅलिसबरी पार्क, गिरिधन भवन चौक, ठाकरे वसाहत, पर्वती गावठाण, मीठानगर, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, ज्ञानेश्वर नगर, साईबाबा नगर, पर्वती दर्शन, कात्रज परिसर, तळजाई, धनकवडी परिसर, एरंडवणा, कर्वे रस्ता, प्रभात रस्ता, विधी महाविद्यालय रस्ता, भांडारकर रस्ता, हॅपी काॅलनी, गोसावी वस्ती, मयूर काॅलनी, सहवास सोसायटी परिसर, गिरिजा शंकर विहार, दशभुजा गणपती मंदिर परिसर, वकील नगर, पटवर्धन बाग, डीपी रस्ता, गुळवणी महाराज रस्ता, गणेशनगर, राहुलनगर, करिष्मा सोसायटी, संगमप्रेस, सिसिटी प्राईड परिसर, औंध, बोपोडी, भोईटे वस्ती, पुणे विद्यापीठ परिसर, चिखलवाडी, खडकी, आनंद पार्क, सानेवाडी, आंबेडकर वसाहत, संकल्प पार्क, सकाळनगर, चव्हाणनगर, अभिमानश्री सोसायटी, सिंध सोसायटी, पुणे स्थानक परिसर, लष्कर भाग, मुळा रस्ता, कोरेगांव पार्क, ताडीवालार स्ता, रेसकोर्स परिसर, वानवडी, कोंढवा, हडपसर, महंमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, येरवडा परिसर, विश्रांतवाडी, नगर रस्ता, कल्याणीनगर, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड काॅलनी, वडगांवशेरी, चंदननगर, खराडी, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हिंगणे, आनंदनगर, वडगांव, धायरी, आंबेगाव  पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक, आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर, टिळेकरनगर या भागाचा समावेश आहे.

The work on six water tanks of Pune Municipal Corporation is still not complete Pune print news
सहा टाक्या, तरी पाणी मिळेना! पुण्यातील प्रकार
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Water supply to Ulhasnagar Ambernath Badlapur closed for 24 hours
बारवीच्या जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात दुरूस्ती; उल्हासनगरसह अंबरनाथ, बदलापुरातील पाणी पुरवठा २४ तास बंद
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Water supply to Kalyan Dombivli cities to be cut off for 18 hours on Thursday
कल्याण-डोंबिवली शहरांचा पाणी पुरवठा गुरुवारी अठरा तास बंद
Story img Loader