पुणे : चैत्र महिन्यात वसंत ऋतूमध्ये विविध फुलांना बहर येत असतो. त्यातीलच एक असलेल्या सूर्यफुलांचा अभिषेक श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला मंगळवारी करण्यात आला. मंदिराच्या कळसापासून ते गाभाऱ्यापर्यंत तब्बल २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… पुणे : गस्तीवरील पोलीस शिपायाला मारहाण; तिघे अटकेत

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे आणि सकाटा सीड इंडिया प्रा.लि. कंपनीच्या वतीने पहिल्यांदाच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात २१ हजार सूर्यफुलांची आरास करण्यात आली. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जय सिंग यांनी उपक्रमाकरिता विशेष सहकार्य केले होते.

हेही वाचा… पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कारचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

सजावटीमध्ये लावण्यात आलेल्या सूर्यफुलांमध्ये तेलबिया येत नसून या फुलांचा वापर केवळ सजावटीसाठी केला जातो. फुलांच्या पाकळ्यांचा रंग गडद भगवा असून मध्यभाग काळा आहे. ही फुले दिसायला खूप आकर्षक असून शेतातून काढल्यानंतर ७-८ दिवस पाण्यामध्ये व्यवस्थित राहतात. मंदिराच्या कळसावर लावण्यात आलेल्या फुलांवर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे ही फुले अधिकच उठून दिसत होती. भाविकांनी ही आरास पाहण्यासोबतच हे दृश्य आपल्या मोबाईल मध्ये टिपण्याकरिता मोठी गर्दी केली होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Decoration of twenty one thousand sunflower to shrimant dagdusheth ganesh pune print news vvk 10 asj