कितीही लहान क्षेत्र असले, तरी त्याची दस्त नोंदणी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. तरी देखील हवेली तालुक्यातील गुंठेवारी बांधकामांची दस्त नोंदणी होत नसल्याची बाब उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भर कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. हवेली तालुक्यात अशाप्रकारची लाखो बांधकामे असून त्यांची दस्त नोंदणी करण्याची मागणी पाटील यांनी या वेळी केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : पुणे : गौरींसाठी नव्या साड्या, अलंकार खरेदीची लगबग

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना उच्च व तंत्रशिक्षणमंत्री पाटील म्हणाले, ‘गुंठेवारीची नोंदणी होत नसल्याचा विषय गंभीर होत चालला आहे. कितीही लहान क्षेत्र असले, तरी त्याची नोंदणी करण्याबाबत राज्य सरकारने यापूर्वीच आदेश दिले आहेत. जिल्ह्यात अशाप्रकारची लाखो बांधकामे आहेत. या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी कष्टाचे पैसे गुंतवून सदनिका खरेदी केल्या आहेत. ही बांधकामे पाडून टाकायची का? असे करता येणार नाही. त्यामुळे हवेलीतील दस्त नोंदणीचा विषय मार्गी लावावा.’

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deed registration in haveli should be restored demand of chandrakant patil pune print news tmb 01