लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे: बनावट निकाहनामा तयार करुन तरुणीची बदनामी केल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात गेले नऊ महिने पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस चंदननगर पोलिसांनी बुलढाण्यातून अटक केली.

शेख खलील शेख जमील (वय ३०, रा. अमदापूर, ता. चिखली, जि. बुलढाणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी तरुणीच्या नावाने बनावट निकाहनामा तयार केला होता. बनावट निकाहनामा खरा असल्याचे भासवून त्याने तरुणीची बदनामी केली होती. याबाबत तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी शेख पसार झाला होता. त्याचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. गेले नऊ महिने गुंगारा देणारा आरोपी शेख औरंगाबाद, जालना परिसरात वास्तव्यास होता. त्याने राहण्याचे ठिकाण आणि मोबाइल क्रमांक बदलला होता.

आणखी वाचा- पुणे: जंगली महाराज रस्त्यावर मोटारचालकाकडे बतावणी करुन लॅपटाॅप लंपास

आरोपी शेख बुलढाण्यातील चिखली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने शेखला ताब्यात घेतले. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, गुन्हे शाखेचे निरीक्षक जगन्नाथ जानकर, उपनिरीक्षक गोरक्ष घोडके, नामदेव गडदरे, सचिन रणदिवे, संतोष लवटे आदींनी ही कारवाई केली.