लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पुणे दौऱ्यावर आले आहेत. आज सकाळी राजनाथ सिंग डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडीज या संस्थेच्या पदवीप्रदान कार्यक्रमाला उपस्थित राहिले. या कार्यक्रमानंतर दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. बापट यांच्या पत्नी, पुत्र गौरव, स्नुषा स्वरदा आदी या वेळी उपस्थित होते.
गिरीश बापट हे कडवट आणि लढवय्ये नेता होते. त्यांनी भारतीय जनता पक्षाला स्थानिक पातळीवर मजबूत करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. गिरीश बापट यांना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली, अशा शब्दांत राजनाथ सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. गिरीश बापट आणि राजनाथ सिंह यांनी लोकसभेत काही काळ एकत्र काम केले होते.
आणखी वाचा-१६ आमदारांच्या आपत्रतेबाबत देवेंद्र फडणवीस यांचे सूचक विधान
गिरीश बापट यांच्या निधनानंतर आता लोकसभा पोटनिवडणुकीची चर्चा आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.