जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पार पडत आहे. दुपारी दोनच्या सुमारास पालखीचे प्रस्थान होणार आहे. पालखी सोहळ्यात राज्यभरातून वारकरी दाखल झाले आहेत. यंदाच्या वर्षी चांगला पाऊस पडावा अशी मागणी बळीराजाने तुकोबा चरणी केली आहे. यंदाचा पालखी सोहळा हा उत्साहात, निर्विघ्न पार पडावा अशी मागणी देखील बळीराजाने केली आहे.

यंदाच्या वर्षी उन्हाची तीव्रता आणि अवकाळी पाऊस यामुळे हाता तोंडाशी आलेली शेतकऱ्यांची पिके गेली. त्यामुळे शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. तेव्हा मान्सूनमधील पाऊस हा वेळेवर तोही पुरेसा यावा आणि दिलासा मिळावा असे साकडे शेतकरी हे तुकोबाला घालत आहेत.

हेही वाचा… Ashadhi Wari 2023 : देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर अभिनेते योगेश सोमण यांचा एकपात्री नाट्यप्रयोग ‘आनंदडोह’!

हेही वाचा… जगद्गुरू तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहू सज्ज; हजारो वारकरी देहूत दाखल

देहू आणि आळंदीचा पालखी सोहळ्याला सुरुवात होत आहे. मात्र उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर तुकोबांनी बळीराजाचे म्हणणे ऐकावे आणि दोन चार दिवसात पाऊस पडावा अशी मागणी बळीराजाकडून करण्यात आली आहे.

Story img Loader