अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला दिल्लीच्या जनतेने धु- धु धुतले. अशी प्रतिक्रिया भाजप च्या विजयानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. ते पिंपरी- चिंचवडमध्ये बोलत होते. स्वर्गीय आमदार लक्ष्मण जगताप चषक निमित्त ते पिंपरी- चिंचवडमधील सांगवी मध्ये आले होते. यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि संजय राऊत यांच्यावर ही सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी कामठी मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी मी त्यांना चितपट करेल असा विश्वास व्यक्त केला आहे. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी क्रिकेट खेळण्याचा देखील आनंद घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस ला दिल्लीच्या जनतेने धु- धु धुतले आहे. काँग्रेस स्व: कर्तृत्वाने हरली आहे. काँग्रेसने जनतेचा विकास केला नाही.” पुढे ते म्हणाले, दिल्लीचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृवाचा विजय आहे. २७ वर्षानंतरचा हा ऐतिहासिक विजय आहे. भाजप चा मुख्यमंत्री हा दिल्लीच्या तख्तावर असेल. भाजपच दिल्ली च्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकतो. पुढे ते म्हणाले, आमच्या विजयानंतर काँग्रेस ही ईव्हीएम ला दोष देईल. ईव्हीएम खराब झालं म्हणतील. सकाळी नऊ वाजता बोलणारे महाराष्ट्राचे प्रवक्ते देखील आरोप करतील. राहुल गांधी यांनी कामठी विधानसभेत येऊन २०२९ ची निवडणूक लढवावी. हे माझं आव्हान आहे. २५ वर्षांपासून त्या मतदारसंघात भाजपचा विजय होत आहे. पुढे ते म्हणाले, राहुल गांधी यांनी कामठी येथून निवडणूक लढवावी मी त्यांच्याविरोधात लढेल. मी त्यांना चितपट करेल. माझं त्यांना चॅलेंज आहे. त्यांनी निवडणूक लढवावी. पुढे ते म्हणाले, लवकरच महानगर पालिका निवडणूक व्हाव्यात. ही अपेक्षा आहे. शिंदेंच्या नाराजगी च्या चर्चेवर बावनकुळे म्हणाले, एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत. ते त्याग करणारे कार्यकर्ते आहेत.