पुणे : रेल्वे स्थानक, बस स्थानकाच्या आवारात प्रवाशांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या एका महिलेला समर्थ पोलिसांनी पकडले. अटक करण्यात आलेल्या महिलेकडून १२ मोबाइल संच जप्त करण्यात आले असून ती मूळची उत्तरप्रदेशची आहे. महिला सध्या दिल्लीत वास्तव्यास आहे. तिच्याकडून मोबाइल चोरीचे आणखी काही गुन्हे उघड हाेण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर समर्थ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके, पोलीस कर्मचारी रुपाली काळे गस्त घालत होते. त्या वेळी एक महिला सहा महिन्यांच्या बालकास कडेवर घेऊन गर्दीत मोबाइल चोऱ्या करत असल्याची माहिती उपनिरीक्षक त्र्यंबके यांना मिळाली. पोलिसांनी सापळा लावून तिला ताब्यात घेतले. तेव्हा तिच्याकडे असलेल्या पिशवीत १२ मोबाइल संच आढळून आले. तिने रेल्वे तसेच बस स्थानकाच्या आवराातून मोबाइल चोरल्याची माहिती पोलिसांना दिली.

हेही वाचा >>> कसबा पेठेत पूर्ववैमनस्यातून युवकांवर हल्ला

अटक करण्यात आलेली महिला मूळची उत्तरप्रदेशातील असून ती सध्या दिल्लीत राहायला आहे. तिच्याकडून एक लाख ४० हजार रुपयांचे मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत. पोलीस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश साठे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली, हेमंत पेरणे, रहीम शेख, कल्याण बोरडे, दत्तात्रय भोसले आदींनी ही कारवाई केली. महिला तिच्या सहा महिन्याच्या मुलाला कडेवर घेऊन शहरातील गर्दीच्या ठिकाणी फिरायची. गर्दीत महिलांच्या पिशवीतून मोबाइल संच चोरायची. महिलेने साथीदारांच्या मदतीने मोबाइल चोरीचे गुन्हे केल्याचा संशय पोलिसांना असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.