करोना काळानंतर पुस्तक वाचनाचे प्रमाण वाढले आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादा विद्यार्थी-पालकांना समजल्या. त्यामुळे विशेषतः लहान मुलांच्या पुस्तकांच्या मागणीतील वाढ ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत आहे. त्यात कृती पुस्तके, अवांतर वाचनासाठी गोष्टीच्या पुस्तकांना विशेष मागणी असल्याचे निरीक्षण मराठे यांनी नोंदवले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने मराठे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, माधव भंडारी, ॲड. मंदार खरे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा >>> कुणी शहर कार्यालयासाठी जागा देता का जागा?… पुण्यातील सत्ताधारी भाजपवर ही वेळ का आली?

मराठे म्हणाले, की राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे यंदा उज्जैन, शिलाँग, लडाख, गोमती येथे पुस्तक महोत्सव झाला. तर संबलपूर, दिल्ली येथे पुस्तक महोत्सव होणार आहे. कर्नाटक, जम्मू-काश्मीरमध्येही पुस्तक महोत्सव आयोजनाची मागणी आहे. आतापर्यंत झालेल्या पुस्तक महोत्सवांमध्ये पुण्यातील महोत्सवाला मिळालेला प्रतिसाद प्रचंड आहे. त्यामुळे राष्ट्रीय पुस्तक न्यासच्या पुस्तक महोत्सवांमध्ये पुणे कायमचे ठिकाण होऊ शकते. तसेच पुण्यामध्ये दिल्लीत होणाऱ्या वर्ल्ड बुक फेअरशी स्पर्धा करण्याची क्षमता आहे.

हेही वाचा >>> पिंपरी : अखेर महापालिकेच्या कचरा सेवा शुल्क वसुलीला स्थगिती; राज्य शासनाचे आयुक्तांना निर्देश

प्रकाशन व्यवसायासंदर्भातील शास्त्रशुद्ध अभ्यासक्रम उपलब्ध नसल्याने राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमातील सहभागींना प्रत्यक्ष अनुभवासाठी एक महिन्याचे प्रशिक्षणही उपलब्ध करून दिले जाते. आता हा अभ्यासक्रम विद्यापीठांतर्फे राबवण्याचा प्रयत्न आहे. डिजिटल माध्यमाला असलेली मागणी लक्षात घेऊन दृक्-श्राव्य पुस्तके तयार करण्याचे नियोजन असल्याचेही मराठे यांनी सांगितले.

पुस्तकांच्या प्रचारासाठी राष्ट्रीय धोरण

राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे २०११मध्ये पुस्तक प्रचार धोरण तयार करण्यात आले होते. त्याचे पुढे काही झाले नाही. मात्र, आता नव्याने धोरण तयार करण्यात येत आहे. शालेय आणि उच्च शिक्षणातील ३० कोटी विद्यार्थ्यांनी किमान दोन पुस्तके वाचल्यास ६० कोटी पुस्तके वाचली जातील. तसेच केंद्राच्या योजनेनुसार गाव तिथे ग्रंथालय झाल्यास मोठ्या प्रमाणात पुस्तके लागणार आहेत. त्यामुळे पुस्तक प्रचार धोरण महत्त्वाचे ठरणार असल्याचे मराठे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand for childrens books growing after post covid era pune print news ccp 14 zws