पुणे : गेल्या काही दिवसांत उन्हाचा कडाक्याची तीव्रता काहीशी सौम्य झाली आहे. मात्र उकाडा सहन करावा लागत आहे. त्यामुळे रसाळ फळांच्या मागणीत वाढ झाली आहे.
उन्हाळ्यामध्ये रसदार फळांना पसंती दिली जाते. तसेच शरीराचे तापमान राखण्यासाठी अनेकांचा कल ज्यूस पिण्याकडे असतो. त्यामुळे सध्याच्या उन्हाळ्याच्या काळात फळांना, त्यातही रसदार फळांना मागणी वाढली आहे. त्यातही खरबूज आणि कलिंगडांना मागणी कायम आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाच्या प्रतवारीवर परिणाम झाला आहे. लिंबे रसदार नसल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
हेही वाचा – पुणे : लग्नसराईमुळे फुले तेजीत, फुलांच्या दरात दहा टक्के वाढ
केरळमधून ६ ट्रक अननस, संत्री २ टन, मोसंबी २५ टन, डाळिंब ३० टन, पपई ५ टेम्पो, लिंबे दोन हजार गोणी, कलिंगड ३० टेम्पो, खरबूज २५ टेम्पो , पेरू ६०० प्लॅस्टिक जाळी (क्रेट्स), चिकू दीड हजार डाग तसेच हापूस आंबा तीन हजार पेटी अशी आवक झाली. कर्नाटकातील दोन डझनाच्या आंब्याची खोकी तसेच करंड्यांची आवक झाल्याचे फळव्यापाऱ्यांनी सांगितले.